रत्नागिरी : तालुक्यातील नाखरे-कालरकोंडवाडी येथील चिरेखाणीवर बेकायदेशीरपणे वास्तव्य करणार्या 13 बांगला देशी घुसखोरांच्या चौकशीत भाषेचा अडसर निर्माण झाला आहे. या घुसखोरांना मराठी, हिंदी भाषा समजत नाही. त्यांना फक्त बंगाली भाषाच समजत असल्याने त्यांच्या चौकशीसाठी पोलिस दुभाषीचा वापर करणार आहेत.
दहशतवादविरोधी पथकाने मंगळवार, 12 नोव्हेंबर रोजी आसिफ सावकार (रा. पावस बाजारपेठ, रत्नागिरी) याच्या नाखरे ग्रामपंचायत हद्दीतील कालरकोंडवाडी येथील चिरेखाणीवर वास्तव्य करणार्या 13 बांगला देशी घुसखोरांना अटक केली होती. त्या दिवशी न्यायालयाने त्यांना गुरुवार 13 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. गुरुवारी त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 15-11-2024














