रत्नागिरी : शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांचा रत्नागिरी शहरात भाजप पदाधिकाऱ्यांकडून योग्य समन्वयाने मतदारांशी संपर्क साधला जात आहे. महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांनी केलेली विकासकामे आणि भविष्यातील महायुतीच्या संकल्पनेतील कामाची माहिती मतदारांना दिली जात आहे. शहरातील भाजप व शिवसेनेचे नेते समन्वयाने महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत.
शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी आपापल्या प्रभागांमध्ये भाजप नेते, कार्यकर्त्यांना प्रचार कार्यासाठी सोबत घेत आहेत. त्याचवेळी भाजपचे माजी नगरसेवक त्यांच्या प्रभागांमध्ये शिवसेनेच्या नेते आणि कार्यकर्त्यांना सोबत घेवून महायुतीचा प्रचार करत आहेत. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून प्रचाराला जायच्या वेळी युतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना संपर्क साधून बोलावून घेत आहेत. दोन्ही बाजूंनी मान राखला जात असल्याने रत्नागिरी शहरात महायुतीचे प्रचार कार्य समन्वयाने होत असल्याचे दिसून येत आहे.
शहरात उद्यापर्यंत महायुतीचा जाहीरनामा आणि उमेदवार उदय सामंत यांनी केलेल्या कामांची माहिती मतदारांना दिली जाणार आहे. शनिवारपासून मतदारांच्या नावाच्या आणि मतदान केंद्राची माहिती असलेल्या पावत्या वाटल्या जाणार असल्याचे भाजपचे माजी नगरसेवक राजू तोडणकर यांनी सांगितले. शहरात महायुतीला चांगला प्रतिसाद असल्याचेही सांगितले. घरोघरी तसेच दुकानांमध्ये जाऊन मतदारांशी संपर्क साधला जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 AM 15/Nov/2024














