चिपळूण : श्री क्षेत्र परशुराम येथे आज होणार भव्य पणतीचे प्रज्वलन

चिपळूण : श्री क्षेत्र परशुराम येथील डोंगरावर त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने भव्य पणती प्रज्वलित केली जाणार आहे.

शुक्रवार, दि. १५ रोजी दुपारी ४ वाजता जुना कालभैरव मंदिरापासून अनेकजण या कार्यक्रमासाठी निघतील. ज्या भाविकांना यामध्ये सहभागी व्हायचे असेल त्यांनी दुपारी ४ वाजता उपस्थित राहावे. परशुराम मंदिरात जाण्यासाठी गाडीची व्यवस्था करण्यात आली आहे. सायंकाळी ५ वाजता मशाल पेटवून बजरंग मित्रमंडळ पायरवाडी यांच्याकडून दीपमाळ टेकडीवर पोहोचतील. यानंतर पणती प्रज्वलित करण्यात येईल. यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन अभय शिंदे, समीर शेट्ये, शंकर कानडे, जयदीप जोशी यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 AM 15/Nov/2024