रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२३-२४ प्राथमिक फेरी रत्नागिरीतील स्वा. विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह येथे सुरू होत आहे.
दिनांक २६ नोव्हेंबर ते ०४ डिसेंबर २०२४ च्या दरम्यान रोज संध्याकाळी ७ वाजता नाटकाचे प्रयोग सादर होणार आहेत.
सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी नमूद केलेले आहे.
रत्नागिरी केंद्रावर रत्नागिरी शहरासह जिल्हाभरातील एकूण ९ संघांचा सहभाग असणार आहे.
राज्यनाट्य स्पर्धेतील सर्व नाटकांना जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे आणि हौशी रंगकर्मींचा उत्साह वाढवावा असे आवाहन संचालक श्री. चवरे यांनी केलेले आहे.
रत्नागिरी स्पर्धा समन्वयक म्हणून नंदू जुवेकर हे काम पाहत आहेत.
स्पर्धत सहभागी होणार नाटके पुढील प्रमाणे
२६ नोव्हेंबर
शिवाई सहकारी पतसंस्था मर्या. येळवण निर्मित
नाटक – आजीचा बॉयफ्रेंड
२७ नोव्हेंबर
श्रीरंग, रत्नागिरी निर्मित
नाटक – मॉर्फोसिस
२८ नोव्हेंबर
श्री लक्ष्मीपल्लीनाथ व इतर देवस्थान पाली निर्मित
नाटक – अखेरचा सवाल
२९ नोव्हेंबर
संकल्प कलामंच निर्मित
नाटक – रुक्ष
३० नोव्हेंबर
संगमेश्वर तालुका सांस्कृतिक कलामंच, देवरुख निर्मित
नाटक – जब वी मेट
१ डिसेंबर
प्रयोगिक थिएटर्स असोसिएशन रत्नागिरी निर्मित
नाटक – महानायक
२ डिसेंबर
सहयोग रत्नागिरी निर्मित
नाटक – चांदणी
३ डिसेंबर
कोतवडे पंचक्रोशी माजी विद्यार्थी संघ कोतवडे, रत्नागिरी निर्मित
नाटक – कडीपत्ता
४ डिसेंबर
खल्वायन, रत्नागिरी निर्मित
नाटक – स्वप्नपक्षी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 15-11-2024









