➡️ रत्नागिरी : महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतल्याचे चित्र आहे. एकट्या खंडाळा वाटद जिल्हापरिषद गटात काल घेण्यात आलेल्या सभेला सुमारे ५००० ग्रामस्थ उपस्थित होते.
अशीच गर्दी सामंतांच्या प्रत्येक सभांना होत आहे. काल झालेल्या सभेत लाडक्या बहिणींची गर्दी देखील लक्षवेधी होती. आपला भाव निवडणुकीला उभा आहे.
२० तारखेला मतदान करून लाडक्या बहिणींनी आपल्या भावाला पुन्हा एकदा आमदार करायचंय, असे भावनिक आवाहन उदय सामंत यांनी लाडक्या बहिणींना करताच महिलांनी उत्स्फुर्तपणे टाळ्या वाजवून सामंतांच्या आवाहनास प्रतिसाद दिला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 15-11-2024