देवरूख : देशात जी हुकूमशाही फोफावत होती, त्याच्या विरोधात आम्ही एकजुटीने जबरदस्त असा लढा लोकसभा निवडणुकीत दिला. त्यामुळे लोकशाही वाचवण्यात यशस्वी ठरलो, असे प्रतिपादन माजी आमदार सुभाष बने देवरूख हातीव येथील गावभेट बैठकीत केले.
चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीकडून देवरूख परिसरात गावभेट दौऱ्याचे आयोजन केले होते. बुधवारी देवरूख येथील साडवली, हातीव, कांजिवरे येथे गावभेटीवेळी बैठका घेण्यात आल्या. यावेळी यादव म्हणाले, विकासाचे जे प्रश्न आहेत ते येत्या काळात मार्गी लावले जातील. रवींद्र माने, सुभाष बने आणि राजेंद्र महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कामे केली जातील. तर याप्रसंगी राजेंद्र महाडिक म्हणाले, विकास काय असतो हे या तालुक्याला शिवसेनेने दाखवून दिले आहे. हा तालुका, येथील लोकांनी जपला आहे. त्यामुळेच लोके आमच्यावर अखंड प्रेम करत राहिले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 PM 15/Nov/2024














