रत्नागिरी : मी अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिले आहेत. रत्नागिरी मतदारसंघासाठी इतके ‘चौफेर’ विकास कार्य आजवर कोणीही केलेले नाहीं. उदय सामंत यांनी राज्याचे उद्योगमंत्री झाल्यापासून मागील २ वर्षांत रत्नागिरी मतदारसंघासाठी डोंगराएवढे विकास कार्य केले ही वस्तुस्थिती आहे. असा कर्तबगार नेताच विकासाचा गाडा पुढे नेऊ शकतो, अशी प्रतिक्रिया शासकीय एड. कॉलेजचे निवृत्त प्राचार्य प्रताप सावंतदेसाई यांनी केले.
रत्नागिरी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार व विद्यमान आमदार उदय सामंत यांच्या राजकीय कारकिर्दीबाबत ते बोलत होते. सावंतदेसाई म्हणाले, सामंत यांनी डोंगराएवढे विकासकार्य केले आहे. त्यांनी अनेक विकासकार्याचा श्रीगणेशा केला. त्यापैकी काही विकासकामे पूर्ण झाली, तर काही पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. या घडीला ही सर्व विकासकामे पूर्ण करण्यास ‘सक्षम’ असलेले तेच एकमेव नेते आहेत. त्यांना मतदारसंघाच्या विकासासाठी पुन्हा संधी दिली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘चौफेर’ विकासकामे पूर्णत्वास नेण्यासाठी एकमेव कर्तबगार, सक्षम व समर्थ तसेच सुसंस्कृत व सृजनशील नेते आहेत. रत्नागिरीचा ‘सर्वांगीण’ विकास आमदार व नामदार होणे ही काळाची गरज आहे. एवढे विविधांगी व सर्वांगीण विकासकार्य पूर्ण करण्यासाठी कार्यक्षम, तत्पर व प्रचंड क्षमता असणारे नेतृत्व हवे. विकासकामांचा आवाका फार मोठा आहे व ते पूर्ण करून घेण्यासाठी रत्नागिरीचे नेतृत्व समर्थ व सक्षम नेते म्हणून सामंत यांच्याकडेच पाहिले जाते.
सामंत हे राज्यातील एक वे आघाडीचे नेते म्हणून ओळखले जातात. मुख्यमंत्र्यांचे ते अत्यंत आवडते व कर्तबगार आणि विश्वासू आहेत. जबाबदारीची मोठमोठी कामे पक्षाकडून त्यांच्यावर सोपवता येतात. यावरून त्यांची कर्तबगारी रुप अधोरेखित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 PM 15/Nov/2024














