रोजगार निर्मिती हेच माझे टार्गेट : ना. उदय सामंत

रत्नागिरी : चाफे गावासह संपूर्ण रत्नागिरीचा विकास होत आहे. आपली मुलं रत्नागिरीतच नोकरी, व्यवसायासाठी थांबावीत यासाठी रत्नागिरीत रोजगार उपलब्ध होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. रत्नागिरीचा विकास हा माझा ध्यास आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना कधीही बंद होणार नाही, असे आश्वासन महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांनी दिले.

उदय सामंत यांच्या जोरदार प्रचार सभा सुरू असून, एका दिवसात तालुक्यात दहा सभा घेण्याचा सपाटा त्यांनी लावून प्रचाराचे रण त्यांनी तापवले. या वेळी चाफे येथे महायुतीच्या सभेत ते बोलत होते. शिवसेना विभागप्रमुख प्रवीण पांचाळ, भाजपचे दत्ता देसाई, प्रतीक देसाई, खालगावचे सरपंच प्रकाश खोल्ये, चाफे गावचे सरपंच श्रद्धा गोवळकर, माजी. प. स. सदस्य शंकर सोनवडकर यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने मतदार बंधू-भगिनी उपस्थित होते.

सुरवातीला सामंत यांची सभा रत्नागिरी तालुक्यातील पोमेंडी गावी झाली. महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून शिवसेनेच्या धनुष्यबाण निशाणीच बटण दाबून मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याची विनंती मतदारांना केली. त्यानंतर पानवल येथे महायुतीच्या बैठकीला झाली. रत्नागिरीत होत असणाऱ्या सामाजिक, पर्यटन, आरोग्य, औद्योगिक, शैक्षणिक विकासावर संवाद साधला. या वेळी १९ हजार कोटींचा प्रकल्प रत्नागिरीत येत असून, ३० हजार रोजगार निर्माण होणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. या दरम्यान तालुक्यातील पानवल, नाचणे, चाफे, डोर्ले, शिवार आंबेरे येथील महायुतीच्या पदाधिकारी बैठक झाली. गावाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे स्पष्ट करत केलेल्या विकासकामे आणि योजनांची उजळणी केली. या प्रसंगी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुक्यात त्यांनी प्रचार सभांचा सपाटाच लावला होता. एका दिवसात त्यांनी दहा सभा घेऊन प्रचाराचे रण तापवले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:17 15-11-2024