प्रसिद्ध लोककलावंत सुनील बेंडखले यांच्या वाढ दिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : कोकणचा साज संगमेश्वरी बाजच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरात पोहचलेले प्रसिद्ध लोककलावंत सुनील बेंडखले यांच्या वाढ दिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला रत्नागिरीकरानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्हा शासकीय रुग्णालय येथे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सुनील बेंडखले यांच्या वाढ दिवसानिमित्त शुक्रवार १५ नोव्हेंबर रोजी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सौरभ मलुष्ट मित्र मंडळ यांच्यावतीने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी दहा वाजता या रक्तदान शिबिराचा शुभारंभ झाला.शिबिरात ३ तासात २५ रक्त बॉटल जमा करण्यात आल्या. हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सौरभ मलुष्टे मित्रमंडळ चे सौरभ मलुष्टे, उद्योजक दिनेश जठार,अविनाश भोसले,सुमेध नलावडे,स्वप्नील दळी,राजा बामणे,अभिषेक सुर्वे, सुयश सावंत,चिनार प्रसादे,दीपक मेस्त्री,मनोर दळी हे उपस्थित होते. जिल्हा रुग्णालयाच्या रक्त पेढीतील कर्मचारी वर्ग यांचे मोलाचे सहकार्य ह्या कॅम्प साठी लाभले त्यांचे देखील मित्रमंडळ च्या वतीने आभार मान्यात आले.

सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयात रक्ताचा मोठा तुटवडा असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन जिल्हा शासकीय रुगणालाय रक्तपेढी च्या वतीने करण्यात आले आहे..

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:17 15-11-2024