खेड : साखरोलीतील टू-व्हिलर गोदामाला आग

खेड : तालुक्यातील साखरोली येथील पेट्रोलपंपाशेजारी असलेल्या ड्रीम लाईन मोटर्स, इलेक्ट्रिक टू-व्हिलर गोडावूनला मंगळवारी सायंकाळच्या सुमारास आग लागली. येथील नगर पालिकेच्या अग्निशामक दलास कळविल्यानंतर तातडीने घटनास्थळी पोहोचून कर्मचाऱ्यांनी अवघ्या तासांतच आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला.

या ठिकाणी आग लागल्याची खबर मिळताच अग्निशमक केंद्रातील फायरमन दीपक देवळेकर, श्याम देवळेकर, सहायक फायरमन प्रणय रसाळ, जयेश पवार, प्रणव घाग, वाहनचालक विद्याधन पवार, गजानन जाधव, आदींनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत गोदामामधील साहित्याचे नुकसान झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:42 15-11-2024