इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जेम्स अँड ज्वेलरी चा रत्नागिरी कॅम्पस सुरु करून उदय सामंतांनी रत्नागिरीच्या सोनार व्यवसायात मोठी क्रांती घडवली

➡️ रत्नागिरी : रत्नागिरीतील ज्वेलरी व्यवसाय काळानुसार अपडेट व्हावा, येथील स्थानिक लोकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण आपल्या रत्नागिरीतच मिळून त्यांना मोठ्या नोकऱ्या मिळाव्यात यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत जीजेईपीसी सारख्या हजारो कोटींचा व्यवसाय असणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जेम्स अँड ज्वेलरी चा रत्नागिरी कॅम्पस सुरु करून येथील सोनार व्यवसायात एक मोठी क्रांतीच केली आहे, असे वक्तव्य रत्नागिरीतील सुप्रसिद्ध अमेय ज्वेलर्सचे अमेय वीरकर यांनी केले आहे.

ते म्हणाले कि आमच्या व्यवसायातील असे आधुनिक प्रशिक्षण घेतल्याने या व्यवसायात युवकांना रोजगाराची मोठी संधी निर्माण झाली आहे. अशा पद्धतीने आमच्या व्यवसायात क्रांती करणाऱ्या उदय सामंतांसारख्या लोकप्रतिनिधीच्या पाठीशी आमचा सुवर्णकार समाज ठामपणे उभा राहील, असे अमेय वीरकर म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:13 15-11-2024