चिपळुणात आज डॉ. अमोल कोल्हे यांची सभा

चिपळूण : चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचार सभेसाठी खासदार व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे चिपळुणमध्ये येणार आहेत. आज १६ रोजी सकाळी ९.३० वा. शहरातील बहादूरशेख चौक येथील वि. दा. सावरकर मैदानावर त्यांची प्रचार सभा होणार आहे. यावेळी माजी आ. रमेश कदम व महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन महाविकास आघाडीतर्फे करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 AM 16/Nov/2024