रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात येथील नगर पालिकेच्या दामले विद्यालयात झालेल्या टपाली मतदानाची छायाचित्रे मुख्य निवडणूक अधिकारी मुंबई कार्यालयाच्या अधिकृत फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आली आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस तसेच इतर जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा येथील नगरपालिकेच्या दामले विद्यालयातील मतदान केंद्रावर केली होती. यावेळी याचा लाभ निवडणूक कर्तव्यावर अधिकारी, कर्मचारी पोलीस यांनी घेतला होता. विशेषतः येथील टपाली मतदानासाठी सूचना हा भला मोठा सुरुवातीलाच प्रदर्शित करण्यात अलेला आणि भला मोठा येथे उभारण्यात आलेला सेल्फी पॉइंट विशेष लक्ष वेधून घेत होता.
दोन दिवस झालेल्या टपाली मतदान प्रक्रियेची छायाचित्रे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर पोस्ट केली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यासाठी ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 AM 16/Nov/2024














