रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी २६६ रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून २६३ दापोली, २६४ गुहागर, २६५ चिपळूण, २६७ राजापूर या मतदारसंघांमध्ये जाणाऱ्या निवडणूक कर्तव्यार्थ नेमण्यात आलेल्या १ हजार १९९ अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी एकूण ३१ बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी दिली.
१९ नोव्हेंबर रोजी सकाळी ४.३० वाजता थिबा पॅलेस रोड येथून ९ बसेस ३६० अधिकारी, कर्मचाऱ्यांना घेवून बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीकडे जाणार आहेत. सकाळी ५.३० वाजता थिबा पॅलेस रोड येथून २६० अधिकारी, कर्मचाऱ्यांना घेवून ७ बसेस विश्वनाथ विद्यालय, लवेल घरडा इन्टिट्यूट (ता. खेड) येथे जाणार आहेत. सकाळी ६ वाजता थिबा पॅलेस रोड येथून २७२ अधिकारी, कर्मचाऱ्यांना घेवून ८ बसेस चिपळूण येथील युनायटेड इंग्लिश स्कूलकडे जाणार आहेत. तसेच सकाळी ६.३० वाजता थिबा पॅलेस रोड येथून ३०७ अधिकारी, कर्मचाऱ्यांना घेवून ७ बसेस आबासाहेब मराठे कॉलेज, राजापूर (विखारेगोठणे) कडे जाणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:41 AM 16/Nov/2024














