रत्नागिरी : मतदानादिवशी मासेमारी बंद ठेवण्याची सूचना

रत्नागिरी : विधानसभा निवडणूक येत्या २० नोव्हेंबर रोजी होत असल्याने १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ पासून २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व मच्छीमार नौका बंदरांमध्ये ठेवण्याबाबत आणि मच्छीमारीशी संबंधित कोणतीही कामकाज न करण्याबाबत सर्व मच्छीमार सहकारी संस्थांमार्फत मच्छीमार नौका मालकांना सूचना देण्यात आली आहे, अशी माहिती सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय आनंद पालव यांनी दिली.

मासळी उतरविण्याच्या केंद्रावर नेमणूक करण्यात आलेले सुरक्षा रक्षक व सागर मित्र यांच्यामार्फत मतदानादिवशी देखरेख ठेवण्यात येणार आहे. याबाबत जिल्ह्यातील सर्व मच्छिमारी संस्थांची दूरदृश्यप्रणालीद्वारे १३ नोव्हेंबर रोजी बैठक घेऊन सूचना देण्यात आली आहे. मतदान केल्याशिवाय कोणतीही नौका मासेमारीस जाणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सर्व मच्छिमारांना माहिती देण्याबाबत कळविण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 16-11-2024