रत्नागिरी : वेल्डिंगच्या कामाला असलेल्या तरुणाने झोपेच्या गोळ्यांचा जादा डोस घेतला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. दिगंबर दत्ताराम मांडवकर (वय ३५, रा. आजगे, ता. लांजा) असे झोपेच्या गोळ्यांचा जादा डोस घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. १४) रात्रीच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मांडवकर यांना मद्य प्राशन करण्याची सवय होती. ते लांजा येथे वेल्डिंगच्या कामाला होते. त्यांनी झोपेच्या गोळ्यांचा जादा डोस घेतला. त्यांना शुक्रवारी (ता. १५) अस्वस्थ वाटू लागल्याने नातेवाईकांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 16-11-2024














