रत्नागिरी : युवक काँग्रेस नेत्याची खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्तता

रत्नागिरी : रत्नागिरी युवक काँग्रेस विधानसभा क्षेत्राध्यक्ष इरफान होडेकर यांची खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्तता झाली आहे. ज्या हॉटेलमध्ये खंडणी मांडण्याबाबतचा गुन्हा दाखल झाला होता त्या हॉटेल मालकानेच न्यायालयात साक्ष देतेवेळी आरोपीला ओळखत नसल्याचे सांगितले. त्याचबरोबर अशी खंडणी मागण्याची घटना घडलीच नसल्याचेही सांगितल्याने ही निर्दोष मुक्तता झाली आहे.

रत्नागिरी शहरातील चर्मालय रोड येथे अरेबियन डिलाईट हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये जानेवारी महिन्यात काँग्रेस नेते इरफान होडेकर घुसले आणि त्यांनी कामगारांना दमबाजी केली. त्याचबरोबर हॉटेल मालकाकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला होता.

न्यायालयातील खटल्याच्या साक्षीवेळी हॉटेल मालकाने आरोपीला ओळखण्यास नकार दिला. यासंदर्भात आपल्याला काही माहीत नाही अशी साक्ष दिली. परिणामी सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने काँग्रेसचे युवक नेते इरफान होडेकर यांची निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे अॅड सचिन पारकर यांनी काम पाहिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 AM 16/Nov/2024