रत्नागिरी : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना फलोत्पादन लागवडीचा लाभ घेता येणार आहे. या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १३ लाख, तर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी एक लाख रुपये अनुदान उपलब्ध आहे. अर्जाअभावी ५० ते ६० टक्के अनुदान अखर्चित राहणार आहे. या योजनेंतर्गत केंद्र शासन व राज्य शासन मिळून ४० टक्के अनुदान देण्यात येते. इच्छुकांना या योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. यासाठी आपले सरकार ई-सेवा केंद्राद्वारेही अर्ज करता येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 AM 16/Nov/2024














