सांगली, मिरज, कहऱ्हाडमधील कोकणकरांना किरण सामंत यांची साद

लांजा : कोकणात कामानिमित्त आणि व्यवसायानिमित्त सांगली, मिरज व कराड या ठिकाणी असणाऱ्या मतदारांशी महायुतीचे उमेदवार किरण ऊर्फ भैया सामंत यांनी संवाद साधत मतदानाला या, असे आवाहन केले.

सांगली, मिरज व कराड या ठिकाणी असणाऱ्या कोकणवासीय संघटनेच्या वतीने स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी किरण सामंत यांनी येथील कोकणातील मतदारांशी संवाद साधला या सभा सांगली व कराड या ठिकाणी झाल्या.

किरण सामंत यांचा राजापूर-लांजा साखरपा मतदारसंघातील शहरात तसेच ग्रामीण भागात प्रचार सुरू आहे. त्यांनी व्यवसायानिमित्त सांगली, मिरज व कराड येथे असलेल्या कोकणवासीयांची भेट घेतली. या वेळेस स्नेहसंमेलनाला मोठ्या संख्येने कोकणकर उपस्थित होते. या वेळी मतदारांशी चर्चा केली. राजापूर-लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचा ऑखोदेखा हाल आणि विकासाची रणनीती याचा लेखाजोखा मतदारांपुढे मांडला तसेच विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या परिवर्तनाच्या लाटेमध्ये सहभागी व्हा, असे आवाहन केले.

त्यांनीही सामंत यांना मतदानासाठी येणार असल्याचे सांगितले. दरम्यान, या प्रसंगी कोकणवासी संघटनेचे अध्यक्ष लह मडेकर, माजी नगरसेवक विष्णू माने, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील कुरुप, बाबा भिंगार्डे, भाजपाचे शेखर इनामदार, आप्पा रसाळ, दत्ता माने यांच्यासहित शेकडो नागरिक उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 AM 16/Nov/2024