राजापूर : रिफायनरी प्रकल्प हा विषय संपला असून, या भागात पर्यावरणपूरक प्रकल्प आणण्यात येणार आहे. येथील लोकांना रोजगाराच्यादृष्टीने मदत केली जाईल. जनतेची सेवा करणे ही माझी जबाबदारी आहे, ती पूर्ण करण्यासाठी मी विडा उचलला आहे, असे प्रतिपादन लांजा-राजापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांनी केले.
गोवळ येथे आयोजित महायुतीच्या सभेत ते बोलत होते. या सभेला कोणीही स्थानिक उपस्थित राहू नये, असा प्रयत्न विरोधकांकडून केला गेला. अडवणुकीची भूमिकाही घेतली गेली; मात्र ग्रामस्थांनी एल्गार करत सभेला उपस्थिती लावली. गावाच्या विकासासाठी पाठबळ देण्याचा निर्धार यावेळी ग्रामस्थांनी केला. विकासाचे पर्व आणि त्या पर्वाच्या सावलीखाली काम करण्याची आमची मानसिकता आहे, असे ग्रामस्थांनी एकमताने सांगितले. यावेळी गणपत गोवळकर, दिनेश गोवळकर, नितीन गोवळकर, प्रकाश गोवळकर, संतोष कांबळे, अनिकेत जाधव, संदीप खोबळ, मोहन गुरव यांच्यासहित शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:45 AM 16/Nov/2024














