लांजा : महाराष्ट्रातील उद्योगधंदे परराज्यात नेऊन बेरोजगारी वाढवण्याचे काम महायुतीच्या सरकारने केले आहे. त्यांना सत्तेपासून रोखण्यासाठी तसेच महाराष्ट्राला समृद्ध करण्यासाठी महाविकास आघाडी सत्तेत आली पाहिजे, असे प्रतिपादन ‘म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेने’ चे उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे बापेरकर यांनी केले.
लांजा येथील आयोजित केलेल्या पत्रकार परीषदेत ते बोलत होते. शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडीचे पक्षाचे उमेदवार राजन साळवी यांच्या प्रचारासाठी लांजा येथे आलेल्या डॉ. बापेरकर यांनी महायुती सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने २४० वर रोखून सत्तेसाठी नितीश कुमार व चंद्रबाबू नायडू यांच्या कुबड्या घ्यायला भाग पाडले त्या भाजपला महाराष्ट्रातील सत्तेतून हद्दपार करा आणि संविधान बदलण्याचे त्यांचे मनसुबे उधळून लावले पाहिजे, लांजा-राजापूर साखरपा मतदारसंघातील मतदारांना सहज उपलब्ध होणारा सुशिक्षित उमेदवार ज्यांनी अनेक विकासकामे केली आहेत त्या साळवींना पाठबळ दिले पाहिजे. महाराष्ट्र समृद्ध करणाऱ्या महाविकास आघाडीला सत्ता स्थापनेत मदत होईल, असे नियोजन या मतदारसंघात झाले या पाहिजे. आमिषाला बळी न पडता विकाची दूरदृष्टी म्हणून साळवींकडे सर्वांनी पाहावे, असे त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे प्रसाद कांबळे उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 AM 16/Nov/2024














