रत्नागिरी : तालुक्यातील कुरतडे ते चांदेराई रस्त्यावर पत्र्याच्या शेडच्या आडोशाला गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी बाळगणा-या महिलेविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (ता. १४) सांयकाळी निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित महिलेकडे विनापरवाना ८१० रुपयांची दारू विक्रीसाठी बाळगलेल्या स्थितीत गुन्हा सापडली. याप्रकरणी महिला पोलिस हवालदार प्रिया सुर्वे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 PM 16/Nov/2024














