रत्नागिरी : गुरांना निर्दयी वागणूक देत मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी मालकावर गुन्हा

रत्नागिरी : आपल्याकडील पाळीव म्हैस व रेडकाला निर्दयतेने वागणूक देत त्यांच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी मालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २९ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीत साळवी स्टॉपनजीकच्या बाजूस पुष्पेंद्रनगरच्या गेटसमोर घडली होती.

सागर वसंत प्रभू असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित मालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात एका महिलेने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित मालक सागर प्रभूने आपल्याकडील म्हैस आणि एक रेडकाला रात्रीच्यावेळी गोठ्यामध्ये न बांधता त्यांना मोकळे सोडून दिल्याने त्यांना रस्त्यावरील अज्ञात वाहनाची धडक बसून त्यामध्ये ही दोन्ही जनावरे जखमी झाली होती. नंतर या जनावरांचा मृत्यू झाला होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 PM 16/Nov/2024