दापोली : माहेरी जाते सांगून दोन चिमुकल्यांसह महिला बेपत्ता

जालगाव : माहेरी जाते असे सांगून आपल्या दोन चिमुकल्यांसह घरातून बाहेर गेलेली त्यांची आई अद्याप घरी न परतल्याने दापोली पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची खबर महिलेचे पती यांनी दापोली पोलीस ठाण्यात केली. ही घटना ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत दापोली पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दापोली तालुक्यातील भानघर पिंपळवाडी येथील मयुरी महेश निकम (२६) ही महिला आपल्या रिया महेश निकम व श्रेया महेश निकम दोघींचे वय दीड वर्ष यांना घेवून दि. ४ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजता माहेरी जात आहे, असे सांगून ती घरातून बाहेर पडली मात्र ती परत घरी पोहोचलीच नाही. दरम्यान, तिचा दापोली एसटी स्टँड परिसर तसेच दापोलीतील सर्व नातेवाईक यांच्याकडे शोध घेतला असता ती कुठे आढळून आली नसल्याने तिचे पती महेश संजय निकम यांनी दापोली पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची खबर दिली असून या घटनेचा अधिक तपास दापोली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस फौजदार मोरे हे करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 PM 16/Nov/2024