हातखंबा येथील उतारात मच्छी वाहतुक करणारा ट्रक उलटला

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथील उतारात मच्छी वाहतूक करणारा ट्रक उलटून अपघात झाला. अपघाताची ही घटना गुरुवार १४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वा. सुमारास घडली. यात ट्रकमधील चालक आणि क्लिनरला किरकोळ दुखापत झाली आहे. सध्या मुंबई-गोवा महामार्ग आणि रत्नागिरी-नागपूर अशा दोन्ही महामार्गाचे काम सुरू आहे. हातखंबा हा पट्टा अपघातांचा डेंजर झोन म्हणून ओळखला जातो.

गुरुवारी दुपारी मच्छी भरलेला एक ट्रक गुजरात ते रत्नागिरी असा येत होता. हातखंबा हायस्कूल जवळील अवघड वळणावर हा मच्छी भरलेला ट्रक आला असता चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला. त्यामुळे भरलेला ट्रक वळणावर पलटी झाला. या अपघातात चालक आणि क्लिनर हे दोघेही बचावले आहेत. या अपघाताची माहिती वाहतूक पोलिसांसह जगद्गुरु श्री नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिजच्या हातखंबा रुग्णवाहिकेचे चालक बाळा केतकर यांना मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वाहतुक पोलिसांनीही एका बाजूची वाहतूक सुरळीत केली. तसेच किरकोळ जखमी झालेल्या चालक क्लिनर यांना रुग्णवाहिकेतून उपचारांसाठी हातखंबा रूग्णालयात दाखल करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:25 PM 16/Nov/2024