रत्नागिरी : उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून अनेकजणानी उदय सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आज उदय सामंत यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत चक्क प्रतिस्पर्धी उमेदवारानेच उदय सामंत यांना पाठिंबा दिला आहे.
नाचणे येथील दिलीप काशिनाथ यादव यांनी रत्नागिरी विधानसभा मतदार संघासाठी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेला देखील त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली नव्हती. मात्र त्यानंतर आज उदय सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांनी आपला बिनशर्त पाठिंबा महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांना दिला आहे. याबाबत पत्रकार परिषद घेत त्यांनी ही घोषणा केली आहे. यावेळी शहर प्रमुख बिपीन बंदरकर हे देखील उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:26 16-11-2024














