निघाली भव्य बाईक रॅली, जणुकाही विजयाची नांदी

रत्नागिरी : शिवसेनाच्या युवासेनेने आज रत्नागिरी शहरात काढलेल्या बाईक रॅली ने अक्षरशः शहर दणाणून सोडले. एव्हढ्या मोठ्या संखेने तरुणाई सामील झालेली ही रत्नागिरीतील पहिलीच रॅली ठरली.

महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांच्या प्रचारार्थ या रॅली चे आयोजन युवा सेनेच्या वतीने करण्यात आले होते. उदय सामंत यांना सर्वच स्तरातून वाढता पाठिंबा असल्याचे दिसत आहे. तालुक्यात होणाऱ्या सभांमधून रेकॉर्ड ब्रेक गर्दी होताना दिसत आहे. अनेक स्माजिक संघटनांनी देखील उदय सामंत यांना आपला बिनशर्त पाठिंबा दर्शवला आहे. त्यातच आज पार पडलेल्या बाईक रॅली ने भर टाकली आहे.

शहरातील मारुती मंदिर येथून सकाळी १०.१५ मिनिटांनी या रॅली ला सुरुवात झाली. माळ नाका, बस स्थानक, राम आळी, काँग्रेस भवन, आठवडा बाजार येथून स्वयंवर मंगल कार्यालय येथे या रॅली ची सांगता करण्यात आली. युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या रॅली साठी खूप मेहनत घेतली होती. उदय सामंत यांच्या पाठीशी येथील तरुणवर्ग किती मोठ्या संखेने आहे, हे या रॅली मध्ये दिसून आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:35 16-11-2024