ट्रक रिक्षा अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान

रत्नागिरी : रत्नागिरीतील जे.के.फाईल्स ते साळवी स्टॉप च्या दरम्यान रिक्षा व ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला असून रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.

कुवारबाव कडून मारुतीमंदिरच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा विरुद्ध बाजूला गेली. त्यामुळे रिक्षा क्र. MH 08 AQ 0617 ला रत्नागिरी शहारा कडून येणाऱ्या MH 08 AP 7434 या ट्रकची जोरदार धडक बसली. हि धडक एव्हढी जोरदात होती, की रिक्षा जागेवर पलटी होऊन रिक्षाच्या टप मध्ये ट्रॅकचे बोनेट घुसले होते. या अपघातावेळी रिक्षा मध्ये चालक व एक पॅसेंजर होते. सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नसून चालक व पॅसेंजर किरकोळ जखमी झाले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:51 16-11-2024