रत्नागिरी : उमरे-धनगरवाडी येथील फार्म हाउस फोडून 22 हजारांच्या सामानाची चोरी

रत्नागिरी : तालुक्यातील उमरे-धनगरवाडी येथील फार्म हाउस फोडून अज्ञाताने 22 हजारांचे घरगुती आणि बागकामाचे सामान लांबवले. ही घटना गुरुवार 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 ते शुक्रवार 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.30 वा. कालावधीत घडली आहे.

याबाबत प्रसन्न सदानंद मयेकर (45, रा. मांडवी, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, त्यांचे उमरे धनगरवाडी येथे स्वानंद नावाचे फार्म हाउस आहे. त्या फार्म हाउसच्या दोन्ही इमारतींच्या दरवाजाचे कडी-कोयंडे तोटून अज्ञाताने पोर्टेबल फ्रिज, स्टिलची शेगडी, गॅस सिलेंडर, फावडे, घमेले, खुरप्या, पक्कड, स्कु ड्रायव्हर, ड्रिल मशिन, फोमचे बेड, चौरंग, उश्या, सीसीटिव्ही नाईट व्हिजन कॅमेरा असे एकूण 22 हजार रुपयांचे सामान चोरुन नेले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:52 PM 16/Nov/2024