खेड : दीपावली सुट्टीच्या हंगामात नियमित गाड्यांना होणाऱ्या गर्दीची तीव्रता कमी करण्यासाठी मध्यरेल्वेने चार दीपावली स्पेशलच्या ३२ फेऱ्या चालवल्या. सर्व फेऱ्यांना प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद ८ फेऱ्या चालवण्यात आल्या.
१२ नोव्हेंबर ला. दीपावली सुट्टीचा हंगाम संपुष्टात आल्याने तीन दीपावली स्पेशल मंगळवारी यार्डात विसावल्या. एलटीटी-कोच्युवेली दीपावली स्पेशलची १४ नोव्हेंबर रोजी अखेरची फेरी होती. धावलेल्या अखेरच्या फेरीनंतर ती यार्डात विसावली.
यापाठोपाठच सावंतवाडी- पनवेल साप्ताहिक स्पेशलही १३ नोव्हेंबरच्या फेरीनंतर यार्डात विसावली. या तीनही स्पेशल गाड्यांना चाकरमान्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. या गाड्यांद्वारे रेल्वे प्रशासनाच्या उत्पन्नातही तितकीच भर पडली आहे.
दीपावली सुट्टी हंगामात कोकण मार्गावर धावणाऱ्या नियमित गाड्यांना प्रवाशांची गर्दी होत असते. ही गर्दी कमी करण्यासाठी मध्यरेल्वे प्रशासनाने एलटीटी-सावंतवाडी, पुणे- सावंतवाडी, सावंतवाडी पनवेल, एलटीटी-कोच्युवेली या चार दीपावली स्पेशल जाहीर केल्या होत्या. एलटीटी- सावंतवाडी साप्ताहिक स्पेशलच्या चालवण्यात आलेल्या ८ फेऱ्यांना प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभला. ८ नोव्हेंबर रोजीच्या अखेरच्या फेरीनंतर स्पेशल यार्डात विसावली. पुणे-सावंतवाडी साप्ताहिक स्पेशलच्याही फेऱ्या थांबणार आहे.
एलटीटी-कोच्युवेली स्पेशलची १४. नोव्हेंबर रोजी अखेरची फेरी धावली. एलटीटीहून सायंकाळी ४ वाजता सुटणारी स्पेशल दुसऱ्यादिवशी रात्री ८.४५ वाजता कोच्युवेली येथे पोहचेल. २१ एलएचबी डब्यांची स्पेशल कोकण मार्गावर पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, मडगाव स्थानकात थांबा होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:30 16-11-2024














