◼️ विविध प्रकल्पातून 38 हजार तरुणांना मिळणार रोजगार
➡️ रत्नागिरी : उद्योगमंत्र्यांनी रत्नागिरीतील तरुणांसाठी काय केलं हा प्रश्न विरोधकांकडून सातत्याने विचारला जात होता. आता वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या एका जाहिरातीने या सर्वांना सणसणीत चपराक मिळाली आहे. रत्नागिरी येथे होत असलेल्या एशियातील पहिल्या सेमी कंडक्टर प्रकल्प साठी 500 जागांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
याविषयीची जाहिरात वृत्तपत्रातील कंपनीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आली आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नाने पहिल्या टप्प्यामध्ये 500 तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे. यास प्रकल्पांतर्गत दीड हजार तरुणांना परदेशात प्रशिक्षणासाठी देखील पाठवण्यात येणार आहे. सेमिकंडक्टरमध्ये तैवान, चीन आणि हाँगकाँग यांची मक्तेदारी आहे. या सर्वांचा लिडर म्हणून तैवानकडे पाहिले जाते. इथून पुढे मेड इन इंडिया म्हणून या प्रकल्पातील उत्पादन नावारुपाला येतील.