रत्नागिरी : उदय सामंत यांनी प्रचारात प्रचंड आघाडी घेतल्याचे दिसत आहे. प्रत्येक गावातून उदय सामंत यांना मोठे पाठबळ मिळत आहे. रत्नागिरीतील कर्ला येथील महायुतीच्या मेळाव्याला राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी – रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी रत्नागिरी- संगमेश्वर विधानसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हासमोरील बटण दाबून मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याची विनंती केली. कर्ला गावच्या विकासाकरिता मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. कर्ला गावच्या मच्छीमार, व्यवसायक यांच्या समस्या सोडविण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. या गावचा पाणी प्रश्न पुढच्या सहा महिन्यात मार्गी लावू, असा शब्द मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी यावेळी बोलताना दिला. याप्रसंगी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष जयसिंग आबा घोसाळे, सरपंच जबीन शिरगांवकर, अख्तरभाई शिरगांवकर, मुनावर गडकडी, समन्वयक सुदेश मयेकर, विभाग प्रमुख शंकर झोरे, राजन शेट्ये, कांचन नागवेकर यांसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मतदार बंधू- भगिनी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 AM 18/Nov/2024