आयर्न बॉर्न फिटनेस हब या व्यावसायिक व्यायामशाळेचा उद्घाटन सोहळा संपन्न

पाली : कष्ट आणि मेहनतीचे फळ नेहमी गोड चाखायला मिळते. त्याची प्रचिती दिनांक 17 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली. आयुष्यमान सतीश अर्पणा अरुण कांबळे या कापडगांव रहिवासी युवकाने पाली बाजारपेठेमध्ये आपल्या स्वप्नातलं आयर्न बॉर्न फिटनेस हब या व्यावसायिक व्यायामशाळेचे उद्घाटन मा. रविंद्र ऊर्फ अण्णा सामंत (उत्तुंग व्यवसायिक) यांच्या हस्ते संपन्न केला.

या नवतरुणाच्या आयर्न बॉर्न फिटनेस हब या व्यावसायिक व्यायामशाळेचे उद्घाटनप्रसंगी मा. रविंद्र ऊर्फ अण्णा सामंत म्हणाले की, एका चांगल्या व्यवसायात नवतरुण सतिश याने आगमन केले आहे. तरुणांनी आणि खेळाडूंनी या व्यायामशाळेचा फायदा उठवायला हवा. सतिश हा स्वतः कष्टाळू आणि मेहनती आहे. त्यामुळे या नव्या व्यावसायामध्ये तो नक्कीच यशस्वी होईल, त्यासाठी सदिच्छा व्यक्त केली आणि शुभेच्छा दिल्या. सतिशला घवघवीत यशासाठी मी शुभेच्छा देतो.

यानंतर पाली गावचे खोत संतोष सावंत यांनी पाली गावात ही तिसरी व्यायामशाळा आहे, काही कारणाने त्या बंद पडल्या. परंतु ही व्यायामशाळा अत्याधुनिक आहे त्यामुळे ती तरुणांना ओढ लावणारी ठरणारी आहे. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषद रत्नागिरीचे माजी समाज कल्याण सभापती पर्शुराम कदम, ग्रामपंचायत कापडगांवचे सरपंच विघ्नेश कोत्रे, सुहास फिटनेस रत्नागिरीचे मालक सुहास मोहिते व त्यांची पत्नी संजीवनी मोहिते, सोहम फिटनेस हातखंबाचे मालक सत्यवान होरंबे, कंत्राटदार सचिन ऊर्फ तात्या सावंतदेसाई, व्यवसायिक अमेय वेल्हाळ, बौध्दजन हितवर्धक संघ कापडगाव या संघाचे अध्यक्ष विश्वास कांबळे व बालकृष्ण कांबळे, उपाध्यक्ष मोहन कांबळे, सहसचिव प्रभाकर कांबळे, माजी सैनिक संतोष कांबळे, कापडगावचे माजी सरपंच अनिल पाडावे, माजी अध्यक्ष महेंद्र कांबळे, माजी सचिव व सल्लागार काशिनाथ कांबळे, माजी सचिव संदेश कांबळे, अभियांत्रिकी व कंत्राटदार रोशन कांबळे, बौध्दजन हितवर्धक संघ कापडगाव या महिला संघाचे सचिव अनुपमा कांबळे, उपाध्यक्ष अश्विनी कांबळे, सहसचिव निशिगंधा कांबळे, ऑडिटर शितल कांबळे, उपासिका भारती कांबळे, माजी अध्यक्ष राजश्री कांबळे, संदेश वाहक निकिता कांबळे व नंदिनी कांबळे तसेच कापडगावचे व पाली पंचक्रोशीतील रहिवासी, आप्तेष्ट गण यांचे उपस्थितीत आयर्न बॉर्न फिटनेस हब या व्यावसायिक व्यायामशाळेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 AM 18/Nov/2024