रत्नागिरी जिल्ह्यातील तापमानात घट

रत्नागिरी : गेले अनेक दिवस जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने थंडीचा कालावधी लांबला होता. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातही उकाड्याचा प्रभाव होता. गरम हवा, आर्द्रतेमुळे होणाऱ्या काहिलीमुळे नागरिक त्रस्त होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील किमान तापमानात घट झाली. पहाटे गारवा जाणवू लागला आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरावड्यात अवकाळी पाऊस झाल्यानंतर दुसऱ्या पंधरावड्यात हलका गारवा सुरू झाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 AM 18/Nov/2024