संगमेश्वर : भिरकोंड येथील आजोळी राहणारी अल्पवयीन विद्यार्थिनी महाविद्यालयात जाते, असे सांगून घरातून निघून गेली. मात्र, ती संध्याकाळी उशिरापर्यंत घरी परत आलीच नाही. त्यामुळे धास्तावलेल्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेऊनही तिचा कोठेच तपास न लागल्याने अखेर संगमेश्वर पोलिस ठाण्यात बेपत्ता तक्रार दाखल मुलीच्या घरच्यांनी केली आहे.
बेपत्ता अल्पवयीन कॉलेज विद्यार्थिनी ही देवरूख येथील एका महाविद्यालयात १२ वी वर्गात शिक्षण घेत आहे. तिचे मूळ गाव निगुडवाडी असून ती भिरकोंड येथील आजोळी राहून तेथूनच ती देवरुख येथे महाविद्यालयात ये-जा करत असे. त्या प्रमाणे ती बुधवारी सकाळी महाविद्यालयात जाते म्हणून घरातून निघून गेली. मात्र, संध्याकाळी उशिरा पर्यंत ती परत भिरकोंड येथील आजोळी न आल्याने तसेच मूळ गाव असलेल्या निगुडवाडी येथील आई- वडिलांच्या घरी गेली असेल म्हणून आजोळच्या लोकांनी चौकशी केली असता तेथेही न गेल्याने याप्रकरणी धास्तावलेल्या आजोळच्या लोकांनी युवती संगमेश्वर पोलिस ठाण्यात बेपत्ता फिर्याद दाखल केली आहे.
याप्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरोधात १३७ (२) बी एन एस नुसार अल्पवयीन विद्यार्थिनीला फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास संगमेश्वर पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शंकर नागरगोजे करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 AM 18/Nov/2024














