लांजा : मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट करीत पडलेल्या मुसळधार पावसाने तालुक्याला झोडपले. लांजा शहरातील कोत्रेवाडी येथे झाडावर वीज कोसळून झाड जळाले, तर एका घरातील विद्युत उपकरणे जळून नुकसान झाल्याची घटना घडली.
सुदैवाने या घटनेमध्ये जीवितहानी टळली असली, तरी येथील रहिवासी रमेश परशुराम कोत्रे यांच्या घरातील – टी.व्ही. संच तसेच इन्टर व इतर – इलेक्ट्रॉनिक साहित्य जळल्याने मोठे नुकसान झाले. तसेच घरावरील – छपराचे सिमेंटचे पत्रे तुटले. शुक्रवारी १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास लांजा शहरासह तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला. यामध्ये लांजा कोत्रेवाडी येथील रमेश परशुराम कोत्रे यांच्या घराशेजारील साटवली रस्त्यालगत असलेल्या झाडावर प्रचंड आवाज करीत वीज कोसळली. या घटनेत झाडाच्या अक्षरशः चिंधड्या झाल्या. वीज कोसळल्याने १०० फुटांच्या अंतरापर्यंत झाडाचे तुकडे मोठ्या प्रमाणात पडल्याचे दिसून आले. नशीब बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही.
लांजा तालुक्यात अनेक ठिकाणी त्रिपुरारी पौर्णिमा यात्रोत्सव सुरू होता. मात्र, सायंकाळी मुसळधार पाऊस पडल्याने नागरिकांच्या आनंदावर पावसाने विरजण पडले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 18/Nov/2024














