महाराष्ट्र राज्य मानवाधिकार संघटनेतर्फे मतदारांना मतदान करण्याचे आवाहन

देवरुख : येणाऱ्या २० तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मानवाधिकार संघटनेतर्फे योग्य उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपल्या देशाची महासत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. आपल्या देशाच्या विशेष करून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने तसेच महाराष्ट्रातील असंख्य गोरगरीब जनतेचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच शेतकरी, कष्टकरी जनतेचे जटील प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी उच्चशिक्षित, अभ्यासू, असणाऱ्या निःस्वार्थी, कोणत्याही प्रकारे भ्रष्टाचाराचा डाग न लागलेल्या सर्व धर्म समभावाने वागणाऱ्या अशा उमेदवारांची महाराष्ट्राला व देशाला गरज आहे. उच्चशिक्षित, अभ्यासू असणाऱ्या निः स्वार्थी, कोणत्याही प्रकारे भ्रष्टाचाराचा डाग न लागलेल्या सर्वधर्म समभावाने वागणाऱ्या अशा उमेदवारांची महाराष्ट्राला व देशाला गरज आहे. तरी सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती आहे की, भ्रष्टाचाराने माजलेल्या, पैसे ओतून मतदारांना विकत घेणाऱ्या तसेच अनेक आमिषे दाखविणाऱ्या फसव्या उमेदवारांपासून सावध होऊन स्वच्छ भावनेने एक आदर्श अभ्यासू उमेदवाराला निवडून देऊन आपण आपला व आपल्या गावाच्या तसेच राज्याच्या विकासासाठी हातभार लावूया, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष बाळकृष्ण सोनू वनकर यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 AM 18/Nov/2024