रत्नागिरी : जिल्हा धनगर समाज संघाचा महायुतीला पाठिंबा

रत्नागिरी : धनगर समाज संघ ही सामाजिक संघटना समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असते. भविष्यातील समाजाच्या विविध गरजा लक्षात घेऊन निवडणुकीमध्ये महायुतीला पाठिंबा देत आहोत, असे पत्र जिल्हाध्यक्ष अनंत आखाडे व उपाध्यक्ष तुकाराम बावदाने यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

त्यांनी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना जाहीर पाठिंबा दिल्याचे कळविले आहे.

पत्रकात म्हटले आहे की, ‘स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षांमध्ये धनगर समाजाच्या प्रश्‍नांकडे कोणीही लक्ष दिले नाही. आजही आरोग्य, रस्ते, पाणी, शिक्षण यासारख्या मूलभूत सुविधा जिल्ह्यातील धनगर वाड्यांपर्यंत पोहचलेल्या नाहीत, ही खंत आहे. कमी लोकसंख्या, शिक्षणाचा अभाव, राजकीय प्रतिनिधी नसल्याने कोणत्याही पक्षाने फारसे विचारात घेतले नाही. मात्र, आता समाजावरील अन्याय दूर करण्याचे आश्‍वासन महायुतीकडून मिळाल्याने जिल्हा धनगर समाज संघातर्फे विधानसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष अनंत आखाडे यांन प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 18-11-2024