रत्नागिरी : संगमेश्वर रेल्वे स्टेशनच्या बाकावर आजारी अवस्थेत सापडून आलेल्या प्रौढाचा उपचारांदरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. दत्तात्रय रामदास दवणकर (वय ४६) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. दत्तात्रय दवणकर हा दारूचा व्यसनी आहे. शुक्रवार १५ रोजी हातपाय दुखत असल्याने व श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तो संगमेश्वर रेल्वे स्टेशनच्या बाकावर आजारी अवस्थेत झोपलेला असताना तेथील स्टेशन मास्तरना दिसून आला होता. त्यांनी त्याला रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, उपचारांदरम्यान शुक्रवारी दुपारी १.३० वा. सुमारास त्याचा मृत्यू झाला. याबाबत संगमेश्वर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 AM 18/Nov/2024