‘बाईक रायडर्स’ ची रस्ता सुरक्षिततेबाबत जागृती

लांजा : ठाणे – मुंबई ते कन्याकुमारी व कन्याकुमारी ते मुंबई असा तब्बल साडेतीन हजार किमीचा प्रवास करत रस्ते सुरक्षिततेचा संदेश देणाऱ्या बाईक रायडर्स यांनी समाज प्रबोधन सुरू केले आहे. राज्याच्या विविध भागातील मुंबईस्थित असणारे हे युवक द मिस्टिक वंडरर या संस्थेकडून समाज प्रबोधन करत आहेत.

रस्ते सुरक्षा आणि घ्यावयाची काळजी असा संदेश देणारे हे द मिस्टिक वंडरर या संस्थेच्या बाईक रायडर्स यांच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. शनिवारी लांजा येथे आले असता त्यांच्या या अनोख्या समाज प्रबोधनाविषयी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. नऊजणांचा हा समूह साडेतीन हजारहून अधिक प्रवास करत आहे. मुंबई- ठाणे येथून ६ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजता बाईक रायडर्स यांनी कन्याकुमारीकडे जाण्यासाठी प्रवासाला सुरुवात केली. अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन रस्ते सुरक्षितता आणि घ्यावयाची काळजी हाच विषय घेऊन जनजागृतीसाठी साडेतीन हजारपेक्षा जास्त प्रवास करत असल्याचे यावेळी बाईक रायडर्स यांनी सांगितले.

पुणे – हुबळी – तिरुअण्णामलाई- रामेश्वरम – कन्याकुमारी असा प्रवास करून पुन्हा कन्याकुमारी ते सिंधुदुर्ग- रत्नागिरी – मुंबई ठाणे असा प्रवास करत आहेत. प्रवास करत असताना अनेक रस्त्यांमध्ये थांबून वाहनचालकांना व नागरिकांना रस्ते सुरक्षिततेबाबत माहिती देत आहेत. दरवर्षी समाजोपयोगी विविध विषय घेऊन देशभरात बाईक प्रवास करून समाज प्रबोधन करत आहेत. या उपक्रमात द मिस्टिक वंडररचे सागर मोहिते, राजेंद्र सार्दळ, संतोष परब, दिनेश सटोल, तृणाल पिसाळ, संदीप पटेल, हेमंत पाटील, जॉन्सन जोसेफ, श्रेयस गावडे सहभागी झाले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 AM 18/Nov/2024