साडवली : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे वर्षानुवर्षाची परंपरा असलेला त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात आला. शेकडो दिव्यांनी संपूर्ण मंदिर परिसर लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला.
हा सोहळा पाहण्यासाठी सर्वांचीच उपस्थिती लाभली जाते. या उत्सवाची सुरुवात देवस्थानचे पुजारी व जंगम यांच्याकडून विधीवत पूजाअर्चा करून झाली. पुजाऱ्यांनी श्री देव मार्लेश्वराचे ३६० मानकऱ्यांना साद घालून आमंत्रण दिले. त्यानंतर सगळे दिवे लावून आरती करून श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे तुळशी विवाह झाला. यावर्षी विशेष आकर्षण शंकराच्या भूजंगाचे दर्शन उत्सवस्थळी सर्वांनाच लाभल्यामुळे उत्सवासाठी जमलेल्या भाविकांकडून समाधान व्यक्त होत होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:38 AM 18/Nov/2024














