चिपळूण : तालुक्यातील कोळकेवाडी धनगरवाडीत गृह मतदानामध्ये सहभागी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी डोंगरदऱ्यातून दीड तासाची पायपीट केल्यानंतर तेथील दोन ज्येष्ठ नागरिकांना मतदानाचा अधिकार मिळाला, उंच कडयावर वास्तव्यास असतानाही राहत्या घरी मतदानाचा अधिकार निभावताना या ज्येष्ठ मतदारांनाही आनंद झाला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिपळूण मतदारसंघात ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांना राहत्या घरी शासकीय यंत्रणा या समाजबांधवांच्या घरी पोहोचले. तेव्हा त्यांच्यातील मतदानाविषयी असलेली मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी शासकीय यंत्रणा सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहे. वाडीवस्तीवर भेटीगाठी देऊन अशा मतदारांचा शोध घेत ही मतदानाची प्रक्रिया राबवली जात आहे. गुरुवारपासून गृह मतदानाची प्रक्रिया सुरू झाली असून, शुक्रवारी तालुक्यातील ग्रामीण भागांत हा कार्यक्रम राबविण्यात आला. या मतदानासाठी पथकांची निर्मिती केली असून, यातील पथके सह्याद्री खोऱ्यात असलेल्या वस्तीमध्ये पोहोचत आहेत. यातील काही मतदार उंच डोंगरमाथ्यावर धनगरवाड्यात वास्तव्यास आहेत.
शासकीय यंत्रणा या समाजबांधवांच्या घरी पोहोचे तेव्हा त्याच्यातील मतदनाविषयी असलेली जागरुकता पाहून अधिकाऱ्यांना आश्चर्य वाटले. तालुक्यातील कोळकेवाडी वाडसाही धनगरवाडीत गृह मतदानासाठीचे एक पथक शुक्रवारी दाखल झाले होते. ६ जणांचा समावेश असलेले हे पथक सकाळी आठच्या सुमारास मोहिमेवर रवाना झाले. मुख्य रस्त्यापासून डोंगरमाथ्यावर असलेल्या या धनगरवाडीत जाताना झाडीझुडपे व जंगलमागनि प्रवास करताना तब्बल दीड तासाची पायपीट करावी लागली. या पथकाच्या निरीक्षक खत्री, समवेत केंद्रस्तरीय अधिकारी मंगेश पिंगळे, मतदान अधिकारी सपना जाधव, केंद्र अध्यक्ष गणेश लोखंडे, पोलिस चाटे, छायाचित्रकार यश कासार, ग्रामपंचायत कर्मचारी संदेश मोहिते आदी धनगरवाडीत पोहोचले.
८५ वर्षीय महिला व दिव्यांग मतदार होते. त्या दोघांना त्यांच्या घरीच मतदान प्रक्रिया समजावून सांगत त्यांचे मतदान करून घेण्यात आले. घरीच मतदान करता आल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला होता. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर पुन्हा दीड तासाची पायपीट करत दुपारी साडेबाराच्या सुमारास हे पथक खाली पोहोचले.
या वस्तीला अजूनही उमेदवारांची प्रतीक्षा
निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून अगदी प्रचार सभापर्यंत अलिप्त असलेला हा समाजबांधव अजूनही उमेदवारांच्या प्रतीक्षेत आहे. उमेदवार धनगरवाड्यांवर येऊन आमचे प्रश्न समजून घेतील, या भावनेतून हे बांधव वाट पाहत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 AM 18/Nov/2024














