दापोली : येथील कर्दे बीचवर पर्यटकांच्या बेजबाबदारपणामुळे दोन दिवस गाडी समुद्रातच अडकली होती. भरतीमुळे गाडी बाहेर काढणे शक्य झाले नाही. अखेर काल ती गाड़ी बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले. यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. दिवाळीच्या सुट्यांपासून पर्यटकांची गर्दी आहे. तसेच वीकेंडलादेखील गदीं सुरूच होती, परंतु येणाऱ्या पर्यटकांची दादागिरी, अरेरावी याचा स्थानिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.
दापोली कर्दे बीचवर पर्यटकांची १४ नोव्हेंबरला गाडी अडकली होती, समुद्राला भरती आल्यामुळे बाहेर काढणे शक्य नव्हते. पौर्णिमेमुळे समुद्राला उधाणाची भरती आली होती, त्यामुळे गाडी बाहेर काढणे कठीण झाले होते. गाड़ी रात्रभर पाण्यातच होती. दुसऱ्या दिवशी म्हणजे १५ नोव्हेंबरला ओहोटी लागल्यावर ही मोटार जेसीबीच्या साह्याने बाहेर काढण्यात आली. स्थानिक नागरिकांचे न ऐकता हे पर्यटक बीचवर गाडी चालवत होते. किनाऱ्यावरील वाळूचा अंदाज न आल्यामुळे ही गाडी वाळूमध्ये रुतली आणि तिला १५ नोव्हेंबरला दुपारी तीन वाजता काढण्यात आले. पर्यटकांना स्थानिक व्यावसायिक सांगत असतात, गाडी समुद्रामध्ये वाळूवर फिरवणे धोकादायक आहे; परंतु पर्यटक ऐकत नसल्यामुळे बेशिस्तपणामुळे व स्थानिक नागरिकांचे म्हणणे न ऐकल्यामुळे अशा घटना घडतात सुदैवाने, घटनेमध्ये जीवितहानी झालेली नाही.
स्टंटबाजी बेतते जीवावर
फिरायला आल्यावर या पर्यटकांचा आगाऊपणा स्थानिकांना त्रासदायक ठरला, समुद्रावर आल्यावर पाण्यात पोहायला जाण्याचा मोह आवरत नाही. तसेच मोटार बीचवर नेऊन स्टंट करण्याचा मोह होते. बरेचसे पुरुष पर्यटक अंतरवस्त्रावरच फिरत असतात. मोठ्या चारचाकी गाड्या घेऊन पुळणीवर जाऊन स्टंटबाजी करतात आणि अशी स्टंटबाजी जीवावर बेतते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 PM 18/Nov/2024














