रत्नागिरी : बागायतीत माकडांचा उपद्रव वाढला

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यात टेंभ्ये, टिके, चाळकेवाडी परिसरात माकडांचा उपद्रव वाढला आहे. शासनाने जिल्हा वार्षिक नियोजनेतून वानर, माकड पकडण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला असला, तरी अद्याप कार्यवाही झालेली नाही. माकडांच्या उच्छादामुळे काजू, नारळ, फळभाज्या, भाजीपाला पिकांचे नुकसान होत आहे. माकड पकडण्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले होते; मात्र अद्याप पुढील कार्यवाही होत नसल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. वन विभागाने तातडीने या माकडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:34 PM 18/Nov/2024