रत्नागिरी : इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलतर्फे जागतिक सार्वजनिक वाहतूक दिनानिमित्त राज्य परिवहन महामंडळामधील चालक, वाहक तसेच कर्मचारी, अधिकारी यांची मोफत नेत्रतपासणी करण्यात आली.
मुख्याधिकारी शंकर यादव, रत्नागिरी विभाग कामगार अधिकारी विलास चौघुले, मृदुला जाधव, बाळाजी कांबळे, राजेश्वर जाधव, राजेश पाथरे व इन्फिगो हॉस्पिटलमधील डॉ. प्रतिभा चाचडी, मंगेश पावसकर यावेळी उपस्थित होते.
याचवेळी इन्फिगोतर्फे रत्नागिरी आगारातील २५ वर्षे उत्कृष्ट काम, सेवा करणारे चालक यशवंत मयेकर, वाहक सुधाकर शिर्के यांचा सत्कार करण्यात आला. सावर्जनिक वाहतूक ही एक महत्त्वाची बाब आहे. आपल्या शहरात वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीचे वाढते ताण आणखी वाढले आहेत. सर्वाधिक लोक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत असल्यामुळे अनेक प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी सर्व कर्मचारी जबाबदारीने काम पार पाडत आहेत. याबद्दल रत्नागिरी एसटी विभागाचे कौतुक करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:42 18-11-2024














