उत्पादित फळांपासून प्रक्रिया उद्योगासाठी अनुदान योजना

रत्नागिरी : कोकणात उत्पादित होणाऱ्या विविध फळांपासून टिकावू पदार्थ बनविण्याच्या पद्धती कोकण कृषी विद्यापीठाने प्रमाणित केल्या आहेत. या पध्दतीचा अवलंब करून महिला आणि युवकांना उद्योगाची संधी उपलब्ध आहे. त्यासाठी शासकीय अनुदान योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील महिला आणि तरुण युवकांनी घ्यावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

कोकणातील उत्पादित फलोत्पादनावर प्रक्रिया उद्योग उभारणे स्थानिकांना शक्य आहे. विशेष करून कोकणातील रानमेवा प्रक्रिया केल्यास त्याची चव चाखण्यासाठी बारमाही खवैये सक्रिय असतात. कोकणात प्रचंड उत्पादित होणाऱ्या काजू बी काढून घेतली की बोंड टाकून दिले जाते. मात्र, या बोंडाच्या रसापासून स्वादिष्ट पेय तयार करता येते. आंब्याचे पन्हे या पेयालाही खास मागणी असते. पिकलेल्या करवंदापासून सिरप तयार करता येते. त्यालाही जगभरात मागणी आहे. अशा प्रक्रिया उद्योगासाठी नव उद्योजकांसह महिलांना शासकीय अर्थ पाठबळ योजना राबविण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कृषी विभागाकडे प्रस्ताव पाठवावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:29 PM 20/Nov/2024