चिपळूण : टीडब्ल्यूजेतर्फे वनराई बंधारे बांधण्यास सुरुवात

चिपळूण : येथील टीडब्ल्यूजे फाऊंडेशनच्या वतीने ‘पाणी अडवा.. पाणी जिरवा’चा संदेश देत चिपळूण तालुक्यातील कालुस्ते बुद्रुक गावापासून वनराई बंधारे बांधण्याच्या उपक्रमास सुरुवात झाली आहे. यासाठी ग्रामस्थही श्रमदान करत आहेत.

टीडब्ल्यूजे फाऊंडेशन गेली २ वर्षे वनराई बंधारे बांधण्याचे कार्य करून पाणी अडवा, पाणी जिरवा असा संदेश देत आहे. त्यासाठी पुढाकार घेऊन ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांना बरोबर घेऊन गावात वनराई बंधारे बांधत आहे. यावर्षी दि. १२ नोव्हेंबर रोजी कालुस्ते बुद्रूक गावापासून वनराई बंधारा बांधण्याची सुरुवात झाली. पूर्व सर्व्हे करून निश्चित केलेल्या जागेवर बंधारा श्रमदानातून बांधण्यास सुरुवात झाली.

बंधारा बांधण्यासाठी प्लॅस्टिकचा कागद घरडा फाऊंडेशन तसेच सिमेंट पिशव्या ग्रामपंचायतीने उपलब्ध केल्या. या ठिकाणी बारा फुटांचा बंधारा बांधण्यात आला. टीडब्ल्यूजे फाऊंडेशन, घरडा फाऊंडेशनचे कार्यकर्ते आणि कालुस्ते बुद्रुक गावचे ग्रामस्थ यांच्या श्रमदानातून बंधारा उभा करण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:59 PM 18/Nov/2024