Breaking : उमेदवारावरील नाराजीमुळे उबाठा पदाधिकारी उदय सामंतांच्या प्रचारफेरीत सामील होणार

रत्नागिरी : आज विधानसभा प्रचाराचा शेवटचा दिवस. प्रचार संपत असतांना शिवसेना उबाठा ला जोर का झटका देण्याच्या तयारीत आहे. आज सायंकाळी महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांची रत्नागिरी शहराच्या बाजारपेठेत प्रचार फेरी आहे. या प्रचार फेरीत ठाकरेंच्या शिवसेनाला रामराम करीत अनेक पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

उबाठा चे विद्यमान उमेदवार बाळ माने यांच्यावर नाराज होऊन अखेर उबाठाचे हे पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या प्रवेशामुळे उबाठा ला मोठे खिंडार पडणार असल्याचे देखील बोलले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:05 18-11-2024