संगमेश्वर : तुरळ-सरंद-आरवली रस्त्याच्या कामाला गती

माखजन : संगमेश्वर तालुक्यातील तुरळ-सरंद-आंबव पोंक्षे-आरवली अशा सुमारे १३ किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला गती आली आहे. केंद्र शासनाकडून गतवर्षी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्यावर सुमारे ७ कोटी रुपये मंजूर झाले होते. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे आवश्यक ठिकाणी मातीकरण, रुंदीकरण व नवीन पाईप टाकून मोऱ्यांची कामे करण्यात आली होती. पुढील प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून, या कामाला गती आली आहे. साधारण ९ मीटर रुंदीचा रस्ता असून गटारे, चढ-उतार कमी करणे, नव्याने मोऱ्या बांधणे अशा अनेक तरतुदी आहेत. मुंबई – गोवा महामार्गावर आरवली ते तुरळ या भागात कोणत्याही कारणास्तव वाहतुकीस अडथळा आल्यास हा रस्ता पर्यायी राहणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:05 PM 18/Nov/2024