खेड : खेड तालुक्यातील चिंचघर – प्रभुवाडी येथील अनिल जयराम कदम ( वय – ५५ ) यांच्या राहत्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलुप अज्ञात चोरटयाने हत्याराने तोडून घरामध्ये प्रवेश करत घरातील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून १ लाख रोख रक्कमेसह १ लाख ५३ हजाराच्या सोन्याच्या दागिन्यांची अशी एकूण २ लाख ५३ हजाराची धाडसी चोरी केली आहे. हि चोरी दि. ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ ते १४ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ४ वाजताच्या मुदतीत घडली आहे.
या चोरीची फिर्याद अनिल जयराम कदम यांनी येथील पोलीस स्थानकात दिल्यानंतर पोलीसांनी १५ नोव्हेंबर २०२४ रोजी अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०५ , ३३१ (३), ३३१ (४) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
खेड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चोरीस गेलेल्या रुपये १ लाख रोख रक्कमेसह चोरीस गेलेल्या मुद्देमाल मध्ये सोन्याचा कुड्याचा एक जोड, ५० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, ५० हजार रुपये किंमतीची दीड तोळ्याची सोन्याची चैन, ८ हजार रुपये किंमतीची एक-एक ग्रॅमची दोन सोन्याची पाने, १० हजार रुपये किंमतीचा सोन्याचा कुड्याचा एक जोड व १५ हजार रुपये किंमतीची पाच ग्रॅम वजनाची एक सोन्याची अंगठी असा एकूण रोख रक्कम व सोन्याचे दागिने मिळून २ लाख ५३ हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला . अधिक तपास येथील पोलीस करीत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:18 18-11-2024














